परमपूज्य बापूंची १३ कलमी योजना

आज आपण इथे सगळे जमलो आहोत, एका वेगळ्या आतुरतेने मला कल्पना आहे. पण मी स्वतः बेसिकली संगीताच्या दुनियेमध्ये रमणारा मनुष्य आहे. निसर्गाच्या सान्निध्यात शांत होणारा मनुष्य आहे. मला संगीतामध्ये शास्त्रीय संगीतापासून लोकसंगीतापर्यंत सगळी संगीतं खूप आवडतात. आणिअसंच माझं एक आवडतं गाणं होतं ...... होतं - ‘तस्वीर बनाता हूँ, तस्वीर नहीं बनती,तस्वीर बनाता हूँ... तस्वीर नहीं बनती, इक ख्वाबसा देखा था, ताबीर नहीं बनती’. खूप आवडायचं मला हे गाणं. पण जेव्हा मी हा भारत फिरायला लागलो, तेव्हा मला हे गाणं सगळ्या भारतभर ऐकू यायला लागलं..... दहा दिशांना. प्रत्येक अन्याय झालेल्याच्या मनामधून हेच गाणं म्हटलं जातंय असं मला वाटत राहिलं. ‘तस्वीर बनाता हूँ, तस्वीर नहीं बनती, एक ख्वाबसा देखा था, ताबरी नहीं बनती’. मन क्षणभर खिन्न झालं. पण परत माझं संगीतच माझ्या मदतीला आलं. ‘तदबीर से बिगडी हुवी तकदीर बनालो, तदबीर से बिगडी हुवी तकदीर बनाले, अपने पे भरोसा है तो इक दाव लगाले, लगाले दाव लगाले’. आणि आज जो मी इथे उभाआहे तो तो ‘दाव लगाने के लिए’. मी आज इथे उभा आहे तो एका धर्मक्षेत्रावर उभा आहे, धर्मक्षेत्रावर उभा आहे. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे..... पण मी जो उभा आहे तो धर्मक्षेत्राचे कुरुक्षेत्र होऊ नये म्हणून उभा आहे. धर्मक्षेत्राचे कुरुक्षेत्र होऊ नये म्हणून उभा आहे, हे लक्षात ठेवा. धर्मक्षेत्राचं रुपांतर कुरुक्षेत्रात करण्यासाठी नाही. म्हणजे नक्की काय? मीजे काही आज बोलणार आहे तो माझाच माझ्याशी झालेला संवाद आहे. माझाच माझ्याशी. आज विश्व ज्या दिशेने प्रगती करत आहे, ज्या दिशेने कूच करत आहे, ती दिशा विनाशाची आहे, नक्कीच विनाशाची आहे. ज्याला आंतरराष्ट्रीयच काय, भारतीयच काय पण साधंसं स्वतःच्या म्युनिसिपालिटीचं राजकारणसुद्धा कळत नाही, ज्याला गल्लीचं राजकारणही कळत नाही अशा गरीब कष्टकर्यापासून ते सर्व राजकारण येत असणार्या, सर्व समाजकारण, अर्थकारण माहित असणार्या माणसापर्यंत प्रत्येकाला याची जाणीव व्हायला हवी की या पृथ्वीवरची मानवाची प्रगती आज प्रगतीच्या दिशेने नव्हे, सुसंस्कृतीच्या दिशेने नव्हे तर अधोगतीच्या दिशेने खूप जोराने चालली आहे. आणि मी इथे उभा आहे ते कुरुक्षेत्र टाळण्यासाठी. परंतु, कुरुक्षेत्र टाळण्यासाठी मी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करीन. परंतु मला दुबळ्यांची अहिंसा मान्य नाही, हे मात्र लक्षात ठेवा. दुबळ्यांची अहिंसा मला मान्य नाही. मला कोणाचा प्रतिकार करता येत नाही म्हणून मी ‘अहिंसा’‘अहिंसा’म्हणून प्रतिकार करणार नाही हे योग्य नव्हे. तर मी सर्वसमर्थ आहे पण तरीदेखील मी शांततेच्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करीन. हे माझं ध्येय आहे.
‘अहिंसा’शब्दामध्येच हिंसा आहे. अहिंसा....हिंसेचा नाश करण्यासाठी जे काही करावं लागेल ती अहिंसा आहे. हिंसा म्हणजे शस्त्राने कोणाचा खून पाडणं नव्हे. माणसाला ठार न मारतासुद्धा हिंसा करता येते. आणि अशा सर्व प्रकारची हिंसा सर्व ठिकाणी बोकाळत चालली आहे. ज्या दिशेने आज प्रत्येक राष्ट्राचं राजकारण चाललेलं आहे, त्याच्यावरुन एक नक्की आहे की लवकरच .... लवकरच आंतराष्ट्रीय राजकारणात लवकरच म्हणजे एक-दोन दिवसांत नाही हे लक्षात ठेवा. सुंदोपसुंदी लवकरच वाढणार आहे. आणि जे अराजक होणार आहे, त्याची नांदी केव्हाच झाली आहे. आज आमच्या या पिढीला पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध याच्याबद्दल वाचून सुद्धा खूप माहिती आहे असं मला वाटत नाही. आम्ही शाळेत पास होण्यापुरतं वाचतो आणि सोडून देतो. आणि म्हणून युद्धाची भाषा बोलणार्यांना हे भान उरत नाही की युद्ध म्हणजे खाऊ नव्हे. ग्रेट ब्रिटन हा ग्रेट ब्रिटन होता. दुसर्या महायुद्धापर्यंत ग्रेट ब्रिटन होता. ते फक्त ब्रिटन उरला. हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. नीट लक्षात घेतलं पाहिजे. पण आम्ही हा इतिहास कधी लक्षात घेतलाच नाही. आणि विश्वास लवकरच उत्पन्न होणार्या उलाढालींमध्ये..... सर्व उलाढालींमध्ये भारताचं स्थान अत्यंत महत्वाचं आहे हे लक्षात ठेवा. अत्यंत महत्वाचं. आमचा देश खूप महान आहे. असं म्हणून देश महान होत नसतो. आमचे पूर्वज खूप महान होते असं म्हणून आम्ही महान ठरत नाही. माझे आजोबा या देशाचे राजे असतील, पण मी जर भीक मागतो तर मी भिकारीच आहे हे मला समजलं पाहिजे. आणि आज आमची परिस्थिती तशी आहे. पण तरीदेखील या भारतालाच पुन्हा एकदा नेतृत्व करायचं हे लक्षात घ्या. १०८ टक्क. पूर्णत्वाने. पण हे सगळं करायचं तर त्यासाठी नुसत्या गर्जना करुन काहीही होणार नाही. आज भारतामध्ये मी बघतो काय, तर बाकीच्या पीकांपेक्षा गप्पांचं पीक फार मोठ्या प्रमाणात आलेलं आहे. शब्द, शब्द आणि फक्त शब्द. शब्दब्रह्माचं ब्रह्मपण निघून गेलं आणि Noise Pollution सुरु झालं एवढे शब्द आहेत. प्रत्येकजण बोलायला मागतो, प्रत्येकाला बोलायचं असतं. आणि दुसर्याने काही करावं अशी त्याची इच्छा असते. इथे मी जो उभा आहे तो लक्षात ठेवा, माझ्या मागून कोणी येवो वा न येवो मी मला करायचं ते करणारच आहे आणि तो माझा कृतनिश्चय आहे. माझ्या मागून माझ्या बरोबरीने धावणारे माझे जीवलग सखे माझ्या बरोबर आले तर मला आनंदच आहे. पण सर्व पृथ्वी जरी माझ्या विरोधात गेली तरीदेखील माझ्या मुल्यांना चिकटूनच मी पुढे चालणार आहे, हे १०० टक्के. १०८ टक्के. पुढचे जे काही मी मुद्दे मांडणार आहे, तो माझा १३ कलमी कार्यक्रम आहे.
पण सगळ्याच्या अगोदच मला एक महत्वाची सूचना करायची आहे, की ह्या संपूर्ण कार्यामध्ये कुठलाही राजकीय पक्ष, अथवा राजकीय संघटना....कुठलाही राजकीय प्रक्ष, अथवा राजकीय संघटना यांच्या कुठल्याही विचारसरणीचा प्रभाव पडलेला.....जरासुद्धा प्रभाव पडलेला मला जराही चालणार नाही. तसेच कुठलीही राजकीय चळवळ ह्यामधून उत्पन्न झालेली मला चालणार नाही. असं थोडंसं जरी कुठेही घडलं तर मी या चळवळीपासून लांब गेलेलो असेन. कारण मला कुठलीही राजकीय महत्वाकांक्षानाही. कुठलीही नाही. १०८ टक्के नाही. ना मला नेता व्हायचं, ना मला राजा व्हायचंय. तुम्ही मला सद्गुरु म्हणालात, मला मान्य. मला देव म्हणालात मला मान्य. तुम्ही मला राक्षस म्हणालात, मला मान्य आहे. तुम्ही मला काही म्हणा, मला सगळं मान्य. पण मला एकाच भूमिकेत जगायचं. मी तुमचा मित्र आहे. कधीही दगा न देणारा मित्र. फक्त भल्याची चिंता करणारा. अत्यंत प्रेमाने, सत्याच्या मार्गावर. हे धर्मक्षेत्र म्हणजे कुठल्याही विशिष्ट धर्माचं क्षेत्र मला अभिप्रत नाही हे लक्षात ठेवा. कारण मला जो धर्म अभिप्रेत आहे तो मानवधर्म. सत्य-प्रेम-आनंद हाच तो धर्म. आणि ह्याच सत्य-प्रेम-आनंदाच्या शत्रुंशी आपल्याला १०० टक्के लढायचंय लक्षात ठेवा. आणि हे लढण्यासाठी मला काय करायला हवं. अनेक पायर्या चढून जायचंय आपल्याला.
माझा पहिला मुद्दा - पहिलं कलम - आणि शेवटचं कलम हे दोन्ही दिशांनी उत्तरोत्तर चढणीचेच आहेत. आम्हाला शांतपणे ऐकायचंय ..... प्रत्येक शब्द ... आमच्या आत शिरण्यासाठी .... नुसतं आत शिरण्यासाठी नाही तर तो आमचा प्राण होण्यासाठी. खूप लहानपणी मी एक गोष्ट वाचली होती. खूप लहानपणी मी एक गोष्ट वाचली होती. एक चिमणी असते. आणि त्या चिमणीची अंडी एक साप येऊन खातो. चिमणी त्या सापाचं काहीही करु शकत नाही. म्हणून चिमणी मुंगुसाला जाऊन सांगते -मुंगुसा, मुंगुसा, बघ ह्या सापाने माझी बाळं खाल्ली. तू ह्या सापाला खाऊन टाक. ह्या सापाला कमीत कमी तुझा धाक तरी घाल. मुंगुस म्हणतो, मला काय पडलंय. मुंगुस म्हणतो - मला काय पडलंय. तुझी पिल्लं ज्याने खाल्ली असतील त्याला तुझं तू काय ते बघ. मी काहीच करु शकत नाही. आणखी पॉवरफुल व्यक्तीला भेटायचा प्रयत्न करते. तिला कोणीच भेटत नाही. असं करता करता तिला एक सिंह भेटतो. ती सिंहाला म्हणते, सिंहा ... माझ्या बाळांचा नाश हा नाग करतोय, हा साप करतो. सापाला खाण्यासाठी मला मुंगुसाची मदत हवीय. तर तू त्या मुंगुसाला धाक दाखंवशील का? म्हणजे तो मुंगुस तुझं ऐकून त्या सापाला धाक देत. सिंह म्हणतो मला काय करायचं. म्हणून चिमणी उडते आणि सिंहाकडून हत्तीकडे जाते. हत्तीला जाऊन म्हणते - हत्तीदादा, हा सिंह माझं ऐकत नाही, हा मुंगुस माझं ऐकत नाही. हा साप येऊन माझी पिल्ल खातो. मी काय करु? हत्ती म्हणतो, मला काय करायचं, मला माझं काम आहे. चिमणी दुःखी होते. तेवढ्यात तिला मुंगी दिसते. ती मुंगीला म्हणते - मुंगीताई, तूही आई आहेस गं. मीही आई आहे. माझी बाळं हा साप येऊन खातो वारंवार. काहीतरी कर ना गं. काहीतरी कर. मुंगी म्हणते, मला माझा साखरेचा साठा गोळा करायचाय. मी काही तुला मदत करु शकत नाही. चिमणी म्हणते, आता मी काय करु? स्वतःच्या दुःखाने प्रेरित होऊन शेवटी चिमणी मुंगीला म्हणते - तू जरा आताच्या आता जाऊन हत्तीच्या कानाला जाऊन चावे घ्यायला सुरुवात केली नाहीस तर मी तुला खाऊन टाकीन. त्या क्षणी मुंगी घाबरते. आणि मुंगी हत्तीच्या कानाला चावते. तेव्हा हत्ती मग सिंहाला दम मारतो, सिंह घाबरुन मुंगुसाला दम मारतो, आणि मुंगुस घाबरुन मग सापाला दम मारतो. शेवटी गोष्ट काय, की जे काही करायचं ते स्वसामर्थ्यावर करावं लागतं. मात्र त्याला युक्तीची जोड असावी लागते. नुसत्या बडबडीने लोकांच्या पुढे लाचार होऊन काहीही मिळत नाही. हे मला समजलं पाहिजे.
जगाच्या राजकारणामध्ये सर्व धोरणं ही सत्तेवरच अवलंबून असतात. दुसर्या महायुद्धाच्या आरंभामध्ये जेव्हा जर्मनीने बाकीची राष्ट्रे गिळायला सुरुवात केली. इेकोस्लोवाकिया सुद्धा संपूर्ण गिळला तोपर्यंत इंग्लंडलासुद्धा त्यांच्या मदतीला जाण्याची गरज भासली नाही. इंग्लंडलाही नाही आणि फ्रान्सलाही नाही. या दोन्ही राष्ट्रांनी त्यांच्याशी मैत्रीचा करार केला होता. की झेकवर कोणी आक्रमण केलं तर आम्ही तुम्हाला मदत करु. पण सोयिस्कररीत्या हा करार विसरला गेला. जेव्हा त्यांच्या हितसंबंधांना झळ पोहोचली तेव्हाच ते लढाईत उतरले. पोलंडच्या बाजूने. हे आम्हाला कळलंच पाहिजे. पण महत्वाची गोष्ट अशी की सर्व धोरणं सत्तेवर आणि सामर्थ्यावर आधारित असल्यामुळे जोपर्यंत आमचा भारत समर्थ होत नाही, तोपर्यंत आम्हाला दुनियेच्या बाजारात काडीचीही किंमत मिळणार नाही हे आम्हाला नीट माहित असलं पाहिजे. परंतु आमचा समाजच कसा आहे, स्वतःकाही करायचं नाही आणि दुसर्याने काही करायचं म्हटलं तर त्याच्या मध्ये आडकाठी कशी येईल त्याच्या पायात पाय घालून त्याला पाडता कसं येईल, एवढंच आम्हाला समजतं. आणि दुसर्याच्या पायात पाय घालून अडवण्याच्या अनेक युक्त्या आमच्याकडे आहेत. अनेक युक्त्या आहेत. या अंतर्गत विरोधाला तोंड देऊनच आपल्याला पुढे जायचं आहे. हे प्रत्येकाला समजलं पाहिजे. अनेक गोष्टींचे उपाय शोधताना आम्हाला असं वाटतं की हे रामबाण औषध आहे. पण ह्या क्षणाला मला मिळू शकत नसेल, तर त्याच्याऐवजी साधं औषध घेऊन जीव टिकवायला पाहिजे. की जेव्हा मला रामबाण औषध मिळेल, तेव्हा मी बरा होईन. पण तोपर्यंत तरी मला जगणं आवश्यक आहे. आज आमच्या ह्या सगळ्या वृत्तींमधून आम्हाला पहिल्यांदा बाहेर पडायला पाहिजे. हा देश माझा आहे. या देशातला प्रत्येक नागरीक माझा कोणतरी लागतो. ही भावना आमच्या मनात खरंच उत्पन्न व्हायला हवी. आणि एकेकाळी ही होती ...... खरंच होती. साधी गोष्ट घ्या. मी मागेही एकदा सांगितलं की रामेश्वरापासून काशीपर्यंत, पशुपतीनाथापर्यंत, पशुपतीनापासून रामेश्वरपर्यंत यात्रिक प्रवासासाठी जात असत, तीर्थयात्रेसाठी जात असत. त्या काळात आजच्यासारखी विमानं नव्हती, ट्रेन्स नव्हत्या, एस.टी गाड्या नव्हत्या. म्हणजे प्रवासाला किती वर्षे लागत असतील मला सांगा. आणि एवढंच नव्हे, त्याकाळात हॉटेल्स पण नव्हती. म्हणजे आम्हीआमचे पैसे फेकू आणि कुठल्याही हॉटेलमध्ये उतरु असं स्वरुप नासयचं तरी या मंडळींचा १२-१२, १४-१४ वर्ष चालणारा प्रवास सुखरुपरीत्या होत होता. कुठल्याही भाषेची अडचण त्यांना येत नव्हती. प्रत्येजण रस्त्यातल्या २२-२३ भाषा शिकून जात नव्हता. तरीदेखील त्याचं स्वागतच होत होतं. आज मात्र आम्ही ह्या पंथाचे की त्या पंथाचे, आम्ही या प्रांताचे की आम्ही त्या प्रांताचे, आम्ही या जातीचे की आम्ही त्या प्रांताचे. किती किती म्हणून आम्ही आमचे तुकउे करत चाललो आहोत, परंतु सैनिकांनी गोळी खावी आणि आम्ही पोळी खावी हे आमचं तत्वज्ञान. आमचं रक्षण फक्त सैनिकांनी करावं, आमची राष्ट्राच्या संरक्षणात आणि सामर्थ्यवादीमध्ये काही भूमिका नाहीत, असंच आम्ही धरुन चालतो. पण चुकीचं आहे. आता मी माझा कार्यक्रम पुढे मांडायला सुरुवात करतोय.
कलम २ : बारमास पाणी शेती चारा योजना
कलम ४ : जुने ते सोने योजना (Old is Gold)
कलम १२ : इन्स्टिट्यूट ऑफ स्टडी ऑफ फाइव्ह कॉन्टिनन्ट्स
माझी १३ कलमं संपली....संपली नाही....सुरु झाली. आम्ही ऐकलं बापूंची १३ कलमं संपली. चुकीची गोष्ट आहे. बापू कधी संपला नाही आणि संपणार नाही. १०० टक्के. त्यामुळे बापूंची १३ कलमंसुद्धा संपणार नाहीत. ती चालूच राहतील.सदैव. मी मागेच सांगितलं, गुरुपौर्णिमेला मी बापू तुम्हाला काय देऊ? मी म्हटलं फक्त रामरक्षा द्या. रामरक्षा म्हणा, घोरकष्टद्धरण म्हणा आणि संपूर्ण विश्वासाठी मला द्या, माझ्या बँकेमध्ये त्यावर व्याज चढून मी सव्याज परत करीन. आणि माझं व्याज खूप मोठं असेल आणि त्यामुळे आम्हाला चेकही करायचं आहे. जे काही म्हणून कराचं आहे, त्यासाठी भक्तीच्या पावलांनी. भक्ती ही कधीही न संपणारी आहे. भक्ति ब्रह्माचे माहेर. आम्ही आजपासून या १३ कलमांना सुरुवात केली आहे. ती चालू राहतील. बापूही चालू राहील. बापूचे सगळे मित्रही चालू राहतील. बापूंना आम्ही काय द्यायचं? म्हटलं रामरक्षा द्या. भक्ती द्या. जप द्या. आज मागतोय, मला तुमचा वेळ द्या. या कार्यामध्ये तुमचा वेळ मला हवाय. तुमचा घाम मला हवाय आणि वेळ पडलीच तर भारतमातेला अभिषेक करण्यासाठी तुमचं रक्त मला हवंय.
-अनिरूध्द
हरि ॐ
सतनाम वाहे गुरु
वाहे गुरु का खालसा - वाहे गुरु की फतेह
वाहे गुरु का खालसा - वाहे गुरु की फतेह
वाहे गुरु का खालसा - वाहे गुरु की फतेह
वाहे गुरु का खालसा - वाहे गुरु की फतेह